बातम्या
शहाजी छत्रपती महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
By nisha patil - 6/6/2025 12:26:45 PM
Share This News:
शहाजी छत्रपती महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
कोल्हापूर, ५ जून –जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग आणि पर्यावरण शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रबंधक श्री. रविंद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. दिपाली पाटील, तसेच एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील व एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी व पर्यावरण शास्त्र विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
शहाजी छत्रपती महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
|