बातम्या
शाही दसरा - 2025 शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम आराधनाचे आयोजन
By nisha patil - 9/25/2025 2:01:37 PM
Share This News:
शाही दसरा - 2025 शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम आराधनाचे आयोजन
कोल्हापूर, दि. 25 : यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवामध्ये कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचा समावेश केला.त्यामुळे या वर्षीपासून कोल्हापूरचा दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यात येत आहे
त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानुषंगाने उद्या शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी सायं. 5.30 ते 6 वाजता दसरा चौक येथे कोल्हापूर पर्यटनबाबत सादरीकरण होणार असून सायं. 6 ते 9 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम-आराधना भाग-2 चे दसरा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
शाही दसरा - 2025 शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम आराधनाचे आयोजन
|