मनोरंजन

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 'शाहू शिधा कीट' उपक्रमाला प्रारंभ गरजू कुटुंबांना मदतीचा हात

Shahu Chhatrapati Foundation Launches ‘Shahu Shidha Kit’ Distribution Drive on Rajarshi Shahu Maharaj’s 152nd Birth Anniversary


By nisha patil - 6/30/2026 12:54:37 PM
Share This News:



कोल्हापूर | प्रतिनिधि : नवाब शेख 

राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने गरजू नागरिकांसाठी 'शाहू शिधा कीट' वाटप उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत भवानी मंडप परिसरातील श्रमिक भगिनी सौ. शाकिरा काझी यांना संस्थेचे सचिव जावेद मुल्ला, कार्यकारिणी सदस्य नवाब शेख आणि श्रीमती माई बोन्द्रे यांच्या हस्ते शाहू शिधा कीटचे वितरण करण्यात आले.

यावेळी दिलीप मराठे, प्रदीप देसाई, प्रवीण ढवळे, अभिजित तोरस्कर, संदीप पाटील आणि सुभाष सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजर्षी शाहू महाराज यांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या विचारांना अभिवादन करत शाहू छत्रपती फौंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून, आगामी काळातही गरजू नागरिकांपर्यंत अशा सामाजिक उपक्रमांद्वारे मदतीचा हात पोहोचविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू छत्रपती फौंडेशनकडून 'शाहू शिधा कीट' उपक्रमाला प्रारंभ
Total Views: 69