शैक्षणिक

शाहू शिक्षण संस्था गुणवंत विद्यार्थी सभासदांचा सत्कार

Shahu Education Institute


By nisha patil - 8/26/2025 1:04:03 PM
Share This News:



शाहू शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेची सभा उत्साहात संपन्न
 गुणवंत विद्यार्थी सभासदांचा सत्कार

 कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभासदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त सभासदांचा व विशेष कामगिरीबद्दल सभासदांचा सत्कार करण्यात आला. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांचे हस्ते हा सत्कार संपन्न झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले होते. संस्थेला 50 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून  दहा टक्के लाभांश व सात टक्के दिवाळी भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची विकासात्मक वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 
   बारावी परीक्षेत भरघोस यश मिळवल्याबद्दल श्रीया मनीष भोसले, जयेश अशोक माने, आयुष अशोक हराळे, स्तुती बाळू कांबळे या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षिसे, पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्री मनीष विजय भोसले यांची श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या विशेष प्रशासन अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेच्या संचालिका सौ. मनीषा संभाजी पाटील यांची श्री साई हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाला क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेतेपद मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले ,अधिक्षक मनीष भोसले, क्रीडा शिक्षक डॉ. प्रशांत पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. 
     साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री संजय पांडुरंग पाटील यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला.   स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बिभीषण पाटील यांनी केले. संस्थेचे सेक्रेटरी पांडुरंग सदाशिव भंडारी यांनी प्रोसिडिंगचे वाचन केले. प्रा. पि.के.पाटील व प्रसाद बिभीषण धावारे यांनी संयोजन केले.अजित पाटील यांनी आभार मानले .
   संस्थेच्या आर्थिक प्रगती बद्दल प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी गौरव उद्गार काढले. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करून सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले .
   सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात ही सभा संपन्न झाली.


शाहू शिक्षण संस्था गुणवंत विद्यार्थी सभासदांचा सत्कार
Total Views: 86