बातम्या
शाहू कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार
By nisha patil - 4/19/2025 11:28:20 PM
Share This News:
शाहू कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार
देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार
कागल तालुक्यातील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाने पुन्हा एकदा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार या प्रकल्पाला सलग तिसऱ्यांदा प्रदान करण्यात आला आहे. पुणे येथे आयोजित भव्य समारंभात माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कारखान्याच्या वतीने संचालक शिवाजीराव पाटील आणि सतीश पाटील यांनी सन्मान स्वीकारला. हा एकूण ७२वा पुरस्कार असून, या यशामुळे कारखान्याचे सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे.
शाहू कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार
|