बातम्या
इचलकरंजी जनता बँकेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 6/27/2025 11:15:47 AM
Share This News:
इचलकरंजी जनता बँकेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी (प्रतिनिधी) – कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास बँकेचे व्हा. चेअरमन संजयकुमार अनिगोळ, संचालक बाबुराव पाटील, बाळकृष्ण पोवळे, सुभाष जाधव, महेश सातपुते, श्रीशैल कित्तुरे, सीईओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, असिस्टंट जनरल मॅनेजर जावेद कुरणे, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण कोळेकर, चिफ मॅनेजर आण्णासो नेर्ले यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या विचारांचा आदर्श बँकेच्या कामकाजातही अनुसरण्याचे आवाहन करण्यात आले.
इचलकरंजी जनता बँकेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
|