बातम्या

श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन

Shahu Shikshan pays tribute to Shripatra Vendre Dada


By nisha patil - 12/28/2025 4:19:45 PM
Share This News:



श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन
 
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांना 105 व्या जयंती दिनानिमित्त आज श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन करण्यात आले.संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे दादा, संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे , माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे ,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील , शिवाजी विद्यापीठाचे माजी बी सी यु डी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर.मोरे, मयुरी इंद्रजीत बोंद्रे  व इतर अनेक मान्यवरांनी श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

   

यावेळी शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ अतुल पाटकर, आयटीआय चे प्राचार्य श्री वागरे, इतर सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय सहकारी उपस्थित होते. 
   

संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  मनीष भोसले, अधीक्षक  विठ्ठल आंबले यांनी संयोजन केले. 
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातही श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दादांच्या जयंती महोत्सवानिमित्त महाविद्यालयात विविध बावीस उपक्रम राबवण्यात आले् विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. दादांना आठवताना या विषयावर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. बी. बलुगडे यांनी व्याख्यान दिले. श्रीपतराव बोंद्रे दादा आता असते तर या विषयावरील शहाजी वार्ता च्या विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 
 

 प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर डी मांडणीकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रा. पि.के.पाटील यांनी सूत्रसंचालन केले . डॉ .डी.के.वळवी यांनी आभार मानले.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या इतर शाखांमध्येही श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.


श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन
Total Views: 66