बातम्या
शाहू जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथांचे आयोजन
By nisha patil - 6/26/2026 1:41:29 PM
Share This News:
शाहू जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथांचे आयोजन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती दिनानिमित्त दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.संस्थेतील विविध शाखांच्या वतीने यावेळी विविध चित्रंथांचे व सजीव देखावे सादरीकरण करण्यात आले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक,युवा नेते इंद्रजीत बोंद्रे यांनी श्रीफळ वाढवून या शोभायात्रेची सुरुवात केली.दसरा चौक येथील श्री शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच शाहू शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास आणि माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनाही अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने ,श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने, जवाहर हायस्कूल, साई हायस्कूल, शाहू आयटीआय, वेणूताई चव्हाण मेडिकल कॉलेज, शाहू महाराज फार्मसी कॉलेज यांच्या वतीने शाहू महाराजांच्या जीवन कार्यावरील विविध देखाव्यांचे प्रदर्शन, सादरीकरण यावेळी करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण, प्राचार्य डॉ. अतुल पातकर, मुख्याध्यापक श्री रवींद्र वागरे, श्री विठ्ठल आंबले, यांचेसह सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, एन एस एस, एन सी सी चे विद्यार्थी यांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवून शाहू महाराजांच्या विचाराचा जागर केला.
शाहू जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथांचे आयोजन
|