बातम्या
‘शाहू’ चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण, कस्तुरी, अवनी व मयुरी चमकले
By nisha patil - 7/22/2025 6:11:11 PM
Share This News:
‘शाहू’ चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण, कस्तुरी, अवनी व मयुरी चमकले
कागल (प्रतिनिधी): शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण गायकवाड (कणेरी), कस्तुरी कदम (गोकुळ शिरगाव), अवनी चौगुले (कागल) आणि मयुरी भोसले (निपाणी) यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट ठरत गौरव मिळवला.
या स्पर्धांचे आयोजन श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री. छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कागल, मुरगुड, सेनापती कापशी व कणेरी या चार केंद्रांवर ही स्पर्धा एकाचवेळी पार पडली.
पहिली ते दहावी, मूकबधिर व मतिमंद विभाग अशा सहा वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा झाली. परीक्षक म्हणून रावसाहेब शेंडे, राहुल सुतार, राहुल गवंडी आणि दिग्विजय मोरे यांनी काम पाहिले.
विजेत्यांना श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल येथे लवकरच होणाऱ्या समारंभात सन्मानित करण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र संबंधित शाळांमार्फत देण्यात येणार आहे.
शाहू’ चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण, कस्तुरी, अवनी व मयुरी चमकले
|