बातम्या

“पन्हाळ्यात ‘शाहू’ ताकद! भोसले यांची बिनविरोध बाजी – विरोधक परगावच्या सफरीवर”

Shahu power in Panhala

By nisha patil - 11/19/2025 5:22:18 PM
Share This News:

“पन्हाळ्यात ‘शाहू’ ताकद! भोसले यांची बिनविरोध बाजी – विरोधक परगावच्या सफरीवर”

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत प्रभाग २ मधून शिवशाहू आघाडीचे सतीश कमलाकर भोसले यांनी बिनविरोध विजयाची बाजी मारली आहे. जनसुराज्य पक्षाशी युती केल्यानंतर त्यांच्या विरोधात उभे असलेले चुलत बंधू अशोक व तानाजी भोसले तसेच गजानन कोळी यांनी अर्ज मागे घेतला.

भोसले हे यापूर्वी 2004 मधील पोटनिवडणुकीतही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. दरम्यान, नगरपरिषद बिनविरोध करण्याच्या जनसुराज्य पक्षाच्या हालचालींना वेग आला असला तरी अनेक उमेदवार नाॅट रिचेबल राहिले तर काही उमेदवार परगावी निघून गेले, अशी राजकीय कुजबूज रंगली आहे.

“पन्हाळ्यात ‘शाहू’ ताकद! भोसले यांची बिनविरोध बाजी – विरोधक परगावच्या सफरीवर”
Total Views: 41