बातम्या
शाहूवाडी उपविभाग गणराया अवॉर्ड २०२५ जाहीर
By nisha patil - 9/19/2025 12:35:48 PM
Share This News:
शाहूवाडी उपविभाग गणराया अवॉर्ड २०२५ जाहीर
सिद्धिविनायक मित्र मंडळ शाहूवाडी प्रथम, बालाजी तरुण मंडळ पन्हाळा द्वितीय, श्रीनाथ वारकरी मंडळ कोडोली तृतीय
पन्हाळा (प्रतिनिधी शहाबाज मुजावर) : पन्हाळा नरके पब्लिक स्कूल, बुधवार पेठ येथे झालेल्या शाहूवाडी उपविभाग गणराया अवॉर्ड २०२५ सोहळ्यात साळशी (ता. शाहूवाडी) येथील सिद्धिविनायक मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.पन्हाळा येथील बालाजी तरुण मंडळ द्वितीय, तर कोडोली (ता. पन्हाळा) येथील श्रीनाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
उत्तेजनार्थ मंडळे : भैरवनाथ डेव्हलपर्स तरुण मंडळ (कळे), हनुमान तालीम मंडळ (अर्जुनवाडा), आवाज तरुण मंडळ (शिवारे).
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता होते. त्यांनी मनोगतात सांगितले की, “कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव हा सामूहिक एकतेचा उत्तम नमुना आहे. विसर्जन मिरवणुकीत एकही अप्रिय घटना घडली नाही, हा जिल्ह्याचा अभिमान आहे. पुढील वर्षी हा अवॉर्ड अधिक मोठ्या प्रमाणावर घेणार आहोत.”
कार्यक्रमात शाहूवाडी उपविभागातील पोलीस पाटील व पत्रकारांचा सत्कार झाला.
उपविभागीय पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी प्रस्तावना मांडली, तर सहायक पोलीस निरीक्षक संजय बोबले यांनी आभार मानले.
या वेळी अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, संतोष गोरे, कैलास कोडग, ज्ञानदेव वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शाहूवाडी उपविभाग गणराया अवॉर्ड २०२५ जाहीर
|