बातम्या
क्षीरसागरांसोबत हस्तांदोलन, कदमांना टाळले – पाटीलांच्या भेटींनी रंगली राजकीय चर्चा
By nisha patil - 8/9/2025 2:41:07 PM
Share This News:
क्षीरसागरांसोबत हस्तांदोलन, कदमांना टाळले – पाटीलांच्या भेटींनी रंगली राजकीय चर्चा
मिरवणुकीत सतेज पाटीलांची भाजप मंडपाला भेट; कदमांचा मंडप टाळल्याने चर्चा
गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा राजकीय रंगही चांगलाच झळकला. भाजप कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावर आमदार सतेज पाटील मंडपात गेले. “मी मूळचाच भाजप आहे,” असे सांगत त्यांनी भाजपच्या मंडपाला भेट दिली. मात्र माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या मंडपाला त्यांनी जाणे टाळले. यामुळे या निर्णयाची मिरवणुकीत मोठी चर्चा रंगली.
यानंतर पाटील यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मंडपात भेट देत त्यांची तब्येत विचारली. नुकतेच रुग्णालयातून घरी परतलेल्या क्षीरसागर यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी दोघे आमदार एकत्र येऊन हस्तांदोलन करताना दिसले.
मनसेसह अनेक मंडपांना पाटील आणि मालोजीराजेंनी भेट दिली. पण कदमांच्या स्वागत कक्षात गेले नाहीत, हे मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले.
क्षीरसागरांसोबत हस्तांदोलन, कदमांना टाळले – पाटीलांच्या भेटींनी रंगली राजकीय चर्चा
|