बातम्या
शक्तीपीठ महामार्ग स्थगित करावा – राजू शेट्टींची केंद्राकडे मागणी
By nisha patil - 9/9/2025 5:11:11 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्ग स्थगित करावा – राजू शेट्टींची केंद्राकडे मागणी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा शक्तीपीठ महामार्ग केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
राजू शेट्टी यांनी सांगितले की, पवनार ते पत्रादेवीपर्यंतची देवस्थाने आधीच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही. शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीतील बॉक्साईट गोव्याला नेण्यासाठीच उपयोगी पडणार असून सामान्य जनतेला याचा फायदा होणार नाही, उलट टोलचा भुर्दंड बसणार आहे. या महामार्गातून तब्बल 50 हजार कोटींचा “ढपला” पाडला जाईल आणि राज्याच्या जनतेवर आर्थिक ओझे येईल, असा आरोप त्यांनी केला.
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी-नागपूर महामार्ग हा कमी रहदारीमुळे तोट्यात चाललेला आहे. भविष्यात गरज पडल्यास त्याचे सहा किंवा आठ पदरी रूंदीकरण करण्यात केंद्र सरकारला काही अडचण नाही. काही ठिकाणी यासाठी जमिनीचे संपादन झालेले असून, तत्काळ रूंदीकरण केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडेल, अशी माहिती त्यांनी दिली.
शेट्टी यांनी राज्य सरकारला शक्तीपीठ महामार्गास तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
शक्तीपीठ महामार्ग स्थगित करावा – राजू शेट्टींची केंद्राकडे मागणी
|