बातम्या
शक्तिपीठ महामार्ग कोणावर लादणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रिमंडळात ग्वाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
By nisha patil - 6/26/2025 11:12:28 PM
Share This News:
शक्तिपीठ महामार्ग कोणावर लादणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रिमंडळात ग्वाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट केले.
शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे शेतीशी असलेले नाते जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय कोणतीही कृती केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात मिळालेल्या क्लीन चीटबद्दल प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, "आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी... परमेश्वर आणि गोरगरिबांच्या आशीर्वादामुळेच हा दिलासा मिळाला."
शक्तिपीठ महामार्ग कोणावर लादणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रिमंडळात ग्वाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
|