बातम्या

शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

Shaktipit mahamarg 8


By Administrator - 8/6/2026 9:53:17 PM
Share This News:



**शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार*

*चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ विरोधी रथयात्रा जोशपूर्वक*

**आजरा(हसन तकीलदार)*:- मंगळवार दि. 09 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार आजरा, चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

आज चंदगड येथील कानूर गावातून शक्तिपीठ विरोधी रथयात्रात निघाली कानूर मधून ही यात्रा कुरणी, म्हाळुंगे, बुजवडे, गवसे(चंदगड)या गावातून आजरा तालुक्यात आली. यावेळी म्हाळुंगे सरपंच विठोबा गावडे, कृष्णा पाटील सहभागी झाले होते.

आजरा तालुक्यात पोळगाव, एरंडोळ, वेळवटी, देवर्डे, मसोली या गावातून पेरणोलीमध्ये आली. प्रत्येक गावात कोपरा सभा घेत शक्तिपीठ महामार्गाला आपला विरोध का अशी भूमिका यावेळी कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे, के.के.भारतीय या कार्यकर्त्यांनी मांडली. प्रत्येक गावात कोपरा सभा होऊन ही रथयात्रा पुढे भुदरगड तालुक्यात निघाली.

 शक्तिपीठ विरोधी रथयात्रेत कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे,के.के.भारतीय, विजय पवार, मायकल बारदेस्कर, पांडुरंग मुगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पेरणोली येथील सभेत शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई आणि सुभाष देसाई यांनी भूमिका मांडून उद्याचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला. निवडणूकीपूर्व शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द झाल्याची घोषणा करून निवडणूकीनंतरच्या पाशवी बहुमताच्या जोरावर शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून होणार असे ठरवून शेतकऱ्यांचा घात करणाऱ्या सरकारच्या विरोधात मंगळवार दि. 09 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी निसर्गप्रेमी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार
Total Views: 10