खेळ
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शंभू दिग्विजय पाटील याचा प्रथम क्रमांक
By nisha patil - 9/29/2026 8:20:01 PM
Share This News:
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शंभू दिग्विजय पाटील याचा प्रथम क्रमांक
कागलच्या सुपुत्राची सोलापूर येथे उल्लेखनीय कामगिरी
कागल, प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कागलचे सुपुत्र शंभू दिग्विजय पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणि क्रीडागुणांचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत शंभू दिग्विजय पाटील यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
शंभू यांच्या या यशामुळे कागलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशामागे त्यांनी घेतलेले परिश्रम, सातत्यपूर्ण सराव तसेच पालक, शिक्षक व मार्गदर्शकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
शंभू पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कागल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कागलचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या शंभू दिग्विजय पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शंभू दिग्विजय पाटील याचा प्रथम क्रमांक
|