बातम्या

शारंगधर देशमुख फाउंडेशन, कोल्हापूर आजरेकर फाउंडेशन, कोल्हापूर

Sharangdhar Deshmukh Foundation


By nisha patil - 8/8/2025 2:58:32 PM
Share This News:



शारंगधर देशमुख फाउंडेशन, कोल्हापूर आजरेकर फाउंडेशन, कोल्हापूर

सफाई कर्मचाऱ्यांसाठी 'अवकारिका' चित्रपटाचे मोफत प्रदर्शन

कोल्हापूर : शारंगधर देशमुख फाउंडेशन व आजरेकर फाउंडेशन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील सफाई कामगारांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेत वाढ करण्याच्या उद्देशाने, 'अवकारिका' या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता शाहू चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या विविध विभागांतील सुमारे ५०० सफाई कर्मचाऱ्यांना सदरचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

हा चित्रपट सफाई कामगार आणि समाजातील विषमता यावर भाष्य करणारा असून, त्यांच्या जीवनातील संघर्ष, आत्मसन्मान व सामाजिक भान वावर प्रकाश टाकतो. समाजाचा अविभाज्य घटक असलेला, नेहमीच दुर्लक्षित राहिलेला व आपल्या आरोग्याची काळजी करणारा सफाई कर्मचारी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये विराट मडके हा कोल्हापूरचा कलाकार प्रमुख भूमिकेत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मा. शारंगधर देशमुख यांनी यावेळी सांगितले की, "सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान समाजासाठी अमूल्य आहे. वास्तवात आपण सर्व नागरिक कचरा निर्माण करतो त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कचरेवाला न म्हणता आपण त्यांना स्वच्छता दूत असे म्हटले पाहिजे. तसेच 'अवकारिका' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या भावविश्वाशी समाज जोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या प्रेरणेसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे."


शारंगधर देशमुख फाउंडेशन, कोल्हापूर आजरेकर फाउंडेशन, कोल्हापूर
Total Views: 79