बातम्या
*गवसे ता.आजरा येथील शारुआजींची 105 व्या वर्षी प्राणज्योत मावळली
By nisha patil - 10/29/2026 2:04:34 PM
Share This News:
*गवसे ता.आजरा येथील शारुआजींची 105 व्या वर्षी प्राणज्योत मावळली
*आजरा(हसन तकीलदार):-गवसे ता. आजरा येथील श्रीमती शारुआजी उमाजी माडभगत यांचे जेवताना भाकरीचा ठसका लागल्याचे निमित्त होऊन 105 व्या वर्षी प्राणज्योत मावळली. शारुआजी या जुन्या काळातील पहिल्या विद्यार्थीनी होत्या. इयत्ता 4थी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. वडील त्या काळातील दिवाणजी कै. बाबुराव(आबा)पाटील यांच्यासारख्याच त्या शिक्षित व धाडसी होत्या.
त्यांना लिहायची आणि वाचायची खूप आवड होती. त्यांच्या धाडसी व निडर वृत्तीमुळे त्यांना भागात गवशाची इंदिरा गांधी म्हणून लोक ओळखायचे. शंभरी पार केल्यानंतरसुद्धा चालणे, बोलणे एकदम तरतरीत आणि ठणठणीत होते. पूर्वी निरक्षर लोकासाठी शासनाने रात्रीची शाळा काढली होती त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून काम केल्या होत्या. सलग दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अखेर जेवत असताना भाकरीचा ठसका लागून वयाच्या 105+वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
*गवसे ता.आजरा येथील शारुआजींची 105 व्या वर्षी प्राणज्योत मावळली
|