बातम्या

शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे अध्यक्ष ठरण्याची शक्यता... शुक्रवारी अधिकृत घोषणा

Shashikant Patil Chuyekar likely to become Gokuls new president

By nisha patil - 5/27/2025 4:25:18 PM
Share This News:

शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे अध्यक्ष ठरण्याची शक्यता... शुक्रवारी अधिकृत घोषणा

 जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अंतिम करण्यात आले असून, शुक्रवारी (30 मे) संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी त्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

शासकीय विश्रामगृहात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील व माजी आमदार संजय घाडगे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी सर्व संचालकांसोबतही काही क्षणांची चर्चा झाली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी फोनवरून निर्णयास मान्यता दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शशिकांत पाटील चुयेकर हेच गोकुळचे नवे अध्यक्ष ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे...

शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे अध्यक्ष ठरण्याची शक्यता... शुक्रवारी अधिकृत घोषणा
Total Views: 100