ताज्या बातम्या

शशिकांत सावंत यांचा विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार

Shashikant Sawant publicly felicitated by various organizations


By nisha patil - 8/11/2025 11:21:32 AM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- आजरा बुरुडे येथील निवृत्त विस्तार अधिकारी शशिकांत आप्पासो सावंत यांची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड झालेबद्दल सर्व दलित संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला.
         शशिकांत सावंत,बुरुडे हे विस्तार अधिकारी म्हणून पदावर काम पाहिले आहेत. सद्या ते आजरा सूतगिरणीमध्ये संचालक पदावर विराजमान आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा अग्रेसर सहभाग असतो. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना या पदावर नियुक्ती करण्यात आली हीच त्यांच्या कामांची पोहच पावती असलेबद्दल प्रास्ताविकपर भाषणात आर. पी. आय. (गवई)पक्षाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना शशिकांत सावंत म्हणाले की, शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. सर्व योजनांचा गोर गरिब गरजूना लाभ मिळवून देण्यासाठी मी या पदाचा प्रामाणिक वापर करणार असे सांगितले. उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी विष्णू कांबळे, गोपाळ होन्याळकर, अशोक कांबळे, मोहन कांबळे, सुरेश दिवेकर, दौलती कांबळे, सुधाकर कांबळे, महेश कामत, गणपती कांबळे, परशुराम कांबळे, अविनाश कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


शशिकांत सावंत यांचा विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार
Total Views: 476