बातम्या

स्वराज्य संस्थेचा शेणगाव येथे फवारणी पंप वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

Shengav


By nisha patil - 4/28/2026 6:23:54 PM
Share This News:



*स्वराज्य संस्थेचा शेणगाव येथे फवारणी पंप वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

शेणगाव : स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगाव यांच्या वतीने सीएसआर फंडातून आयोजित शेतकऱ्यांसाठी २२२ फवारणी पंप वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, शेणगाव येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन  नाथाजी पाटील

(जिल्हा अध्यक्ष, भाजपा) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी

अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला.

तसेच स्वराज्य संस्थेचे अध्यक्षा निवेदिता येडूरे म्हणाल्या की स्वराज्य संस्था हि जनकल्याण योजना राबविण्यसाठी कटिबद्ध आहे यांचा लाभ सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतला जाईल असे प्रतिपादन केले.

त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शेणगांव, आकुर्डे, फर्य, सोनारवाडी येथील शेतकऱ्यांनाफवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शेणगाव गावचे गजानन कोळी यांची भोईराज मच्छीमार सोसायटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुनिल तेली, सुभाष कुंभार, अरविंद कुंभार, भैरवनाथ कुंभार, आशिष कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित विश्वजीत पाटील, आकाश पाटील, संजय भोसले, मोहन कांबळे, संजय जाधव, प्रकाश जाबशेट्टी, डॉ. डी. ए. कुंभार, सुभाष माने, अमोल सदलगे, अनिल कोरगावकर, शिरीष कोरे, सुरज महात, अस्लम महात, महेश कालेकर, गजानन कोळी, नंदकुमार वायचळ, सुशांत नाईक, स्वप्निल पत्की, दिपक नाईक, प्रदीप कुंभार, प्रशांत येडूरे, विनोद कांबळे, सुदर्शन नाईक, साताप्पा भारतीय,पंढरीनाथ कुंभार, नागेंद्र बुवा परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगाव यांच्या वतीने उत्कृष्टरीत्या करण्यात आले.

“शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर” या ब्रीदवाक्यानुसार

संस्था भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


स्वराज्य संस्थेचा शेणगाव येथे फवारणी पंप वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
Total Views: 11