विशेष बातम्या
शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये” – क्षीरसागरांचा घणाघात
By nisha patil - 7/26/2025 3:11:18 PM
Share This News:
शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये” – क्षीरसागरांचा घणाघात
“कोरोना, महापुरात ते कोणत्या बिळात होते?” : राजेश क्षीरसागर
राजकारणात दातृत्व शिकवणाऱ्या राजू शेट्टी यांनी कोरोनाच्या आणि महापुराच्या संकटात गायब राहून नुसती स्टंटबाजी केली, अशी खरमरीत टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. मी अंबाबाई चरणी आयुष्य दान करतो, पण शेट्टींसारख्या दलबदलूंनी मला शिकवू नये, असेही ते म्हणाले.
राजू शेट्टींच्या वैद्यकीय बिलाच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना, “ते सिद्ध करावेत, मी संन्यास घेईन. पण सिद्ध न करता टीका करत असतील, तर त्यांनीच संन्यास घ्यावा,” अशी थेट खुली आव्हानाही त्यांनी दिली.
शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये” – क्षीरसागरांचा घणाघात
|