मनोरंजन

आ. प्रसाद लाड व शिल्पा शेट्टींचे कोल्हापूरात स्वागत

Shilpa shetti


By nisha patil - 7/12/2025 3:26:01 PM
Share This News:



भाजप प्रदेश सचिव महेश जाधव व महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्याकडून स्वागत

कोल्हापूर : विधान परिषद सदस्य आ. प्रसादजी लाड सहकुटुंब आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोल्हापूर भेटीवर आले असता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ येथे भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव व कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

यानंतर आ. लाड व शिल्पा शेट्टी यांनी सहकुटुंब श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले व कोल्हापुरातील परंपरागत देवदर्शनाचा मान राखला.

यावेळी विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


आ. प्रसाद लाड व शिल्पा शेट्टींचे कोल्हापूरात स्वागत
Total Views: 24