बातम्या
शिरढोणमध्ये मीटर पोलवर बसविण्यावरून महावितरणचे आधिकारी धारेवर
By nisha patil - 12/20/2025 4:21:03 PM
Share This News:
शिरढोणमध्ये मीटर पोलवर बसविण्यावरून महावितरणचे आधिकारी धारेवर
शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड)/ता.२० शिरढोण (ता.शिरोळ) येथे घरगुती मीटर पोलवर बसविण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व ठेकेदार आले असता ग्रामस्थांनी त्याला विरोध करून परत पाठवत महावितरणचे कनिष्ठ अभियंता वर्षा शहाणे यांना धारेवर धरत जाब विचारला.अखेर मीटर पोलवर बसविणार नाही असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
महावितरणचे कर्मचारी व ठेकेदार घरगुती मीटर पोल वर बसविण्यासाठी आज गावात आले होते.सदरची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन त्याला विरोध दर्शवत पोलवर मीटर बसविण्याचा डाव हाणून पाडत त्यांना परत पाठवले.
ग्राहकांना याबाबतची कोणती कल्पना कल्पना न देता कसे काय पोलवर मीटर बसवत आहात असे म्हणत ग्रामस्थांनी प्रश्नचा भडिमार करत महावितरणचे कनिष्ठ अभियंता वर्षा शहाणे यांना धारेवर धरत जाब विचारला.
सर्वात प्रथम मागासवर्गीय समाजामध्ये सर्वाधिक स्मार्ट मीटर बसून मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहात. असा आरोप कपिल माळकरी यांनी करत प्रथम स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर होते ते बसवण्याची मागणी केली.
तुमच्या कंपनीच्या काय नवीन योजना येथील त्या तुम्ही ग्राम सभेस उपस्थित राहून ग्रामस्थांना माहिती द्या ग्रामसभेचा ठराव मंजूर झाला असेल तर करण्यास आमची काहीही हरकत नाही. मात्र ग्रामसभेत ठराव झाल्याशिवाय स्मार्ट मीटर बदलणे, घरगुती मीटर पोलवर बसवणे असे कोणतेही काम करू नये.अखेर नमती भूमिका घेत घरगुती मीटर पोलवर बसविणार नाही असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य रवि कांबळे,शहाबुद्दीन टाकवडे, शाहिर बानदार,शशिकांत चौधरी, चंद्रकांत मालगावे, कपिल माळकरी,जमीर कागवाडे,बाळासो माळकरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
शिरढोणमध्ये मीटर पोलवर बसविण्यावरून महावितरणचे आधिकारी धारेवर
|