ताज्या बातम्या
शिरढोण ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली
By nisha patil - 12/26/2025 2:33:35 PM
Share This News:
शिरढोण प्रतिनिधी/( संजय गायकवाड )ता. २६ :- शिरढोण (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतीने डिसेंबर महिन्यात आयोजित केलेल्या ग्रामसभेत ५०टक्के सवलत मधून जमा होणारी पाणीपट्टी व घरपट्टी ची रक्कम २६जानेवारीच्या ग्रामसभे पर्यंत खर्च करू नये असा ठराव मंजूर झाला असताना देखील ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत सदरची रक्कम खर्च करत आहेत या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात शाहीर बानदार यांनी आज ग्रामपंचायतीच्या चौकात आमरण उपोषण सुरू केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायती कडील थकीत खातेदारांना ५०टक्के सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला. या योजने अंतर्गत ग्रामपंचायतीकडे जमा होणारी रक्कम प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करूनच रक्कम खर्च करण्याचा ठराव झालेला असताना देखील सदरची जमा होणारी रक्कम ग्रामपंचायत खर्च करत आहे. ग्रामसभेच्या झालेल्या ठरावाला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात शाहीर बानदार यांनी आमरण उपोषण सुरू केले.या उपोषणाकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी अद्याप कोणीही फिरकले नसल्याने तसेच उपोषणकर्त्याबरोबर चर्चा केली नाही नसल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
प्रतिकिर्या
दिवाळीच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार व बोनस देण्यासाठी इतर व्यक्तीकडून अनामत रक्कम घेतली होती.सदरची रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने आम्ही आम्ही सवलत कर रक्कमे तील पैसे खर्च टाकले आहे.
विराज जथे
ग्रामसेवक
ग्रामपंचायत शिरढोण
शिरढोण ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली
|