विशेष बातम्या
शिरढोण सरपंचावर खोटा राजीनामा आरोप
By nisha patil - 10/12/2025 3:05:03 PM
Share This News:
शिरढोण सरपंचावर खोटा राजीनामा आरोप
शिरढोण प्रतिनिधी/ता. – शिरढोण (ता. शिरोळ) येथील सरपंच सागर भंडारे यांनी आपला राजीनामा दिला नसल्याचा खोटा बनाव करून प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना दिशाभूल केली असल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी केला आहे.
निवेदनानुसार, सरपंच भंडारे यांनी ७ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला होता. अर्जावर सरपंचांची सही तसेच दोन साक्षीदारांची सह्याही आहेत.
तरीही सरपंचांनी राजीनामा दिला नसल्याचा खोटा बनाव केला आहे, असे सदस्यांचे म्हणणे आहे. राजीनाम्यानंतर नोटीसवर सही करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे, याबाबत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
सदस्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मिळकती धारकांना ५०% करसवलत मिळावी आणि उपसरपंचांच्या सहीने कारभार करावा, असेही नमूद केले आहे.
निवेदनावर भास्कर कुंभार, रवी कांबळे, सौ. शर्मिला टाकवडे, सौ. रेश्मा चौधरी, सौ. भारती मगदूम, सौ. अनिता मोरडे, आरिफ मुजावर, सौ. संगीता मगदूम, शक्ती पाटील व बाबासो हेरवाडे यांच्या सह्या आहेत.
शिरढोण सरपंचावर खोटा राजीनामा आरोप
|