बातम्या
शिरढोण ग्रा.पं.मधील आर्थिक गैव्यवहाराची चौकशी करा
By nisha patil - 12/16/2025 11:04:16 PM
Share This News:
शिरढोण ग्रा.पं.मधील आर्थिक गैव्यवहाराची चौकशी करा
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांचे निवेदन
शिरढोण प्रतिनिधी ,(संजय गायकवाड)/ता.१६ शिरढोण (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायती मध्ये १५व्या वित्त आयोगातील निधीतून केलेला खर्च तसेच घरपट्टी, पाणीपट्टी वसुली व खर्चात झालेल्या आर्थिक गैव्यवहाराची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या घटकावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना शिरढोणच्या ग्रामस्थांनी दिले.
निवेदनात असे म्हटले आहे की १एप्रिल२०२२ते३०नोव्हेंबर २०२५ या वर्षात ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५व्या वित्त आयोगातील निधीतून झालेला खर्च तसेच घरपट्टी पाणीपट्टी वसुली खर्चात गैरव्यवहार आणि कर वसुली करूनही पावती न देणे, मासिक मीटिंगमध्ये अवाढव्य खर्चास मंजुरी देणे, नियमापेक्षा जादा रोखीने खर्च करणे, साहित्य खरेदी याची चौकशी व्हावी.
इस्टिमेट प्रमाणे काम न करणे, दर्जाहीन काम, कामाचे मूल्यांकन व तांत्रिक मान्यता न घेणे, वस्तू व साहित्य खरेदीत वस्तू न घेता बिल अदा करणे, प्रशिक्षण न घेता बिल देणे, लिकेज मोटार दुरुस्ती कामाचे जादा बिल देणे, पाणीपुरवठा साहित्य खरेदी न करता, समाज मंदिर दुरुस्ती न करता तसेच डस्टबिन, आर.ओ खरेदी नकरता बिल अदा करणे इत्यादी कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे
सदर गैरव्यवहाराची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या सर्व घटकावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला उपोषणचा मार्ग अवलंबावा लागेल असे निवेदनात म्हटले या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांना दिले आहेत या निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, माजी उपसरपंच पोपट पुजारी, प्रा.चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, अशोक मगदूम, बाबुराव मुंगळे यांच्या सह्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना शिरढोण ग्रामपंचायतमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशी मागणीचे निवेदन देताना अविनाश पाटील, पोपट पुजारी, चंद्रकांत मोरे, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे
शिरढोण ग्रा.पं.मधील आर्थिक गैव्यवहाराची चौकशी करा
|