बातम्या
शिरोळ पोलिसांची मोठी कामगिरी – चोरीला गेलेली दुचाकी व ११ लाखांचा JCB जप्त
By nisha patil - 9/20/2025 1:34:07 PM
Share This News:
शिरोळ : शिरोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमलदार व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने कारवाई करून तब्बल ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीशचंद्र कांरडे (रा. शिवाजीनगर, मिरज) यांनी ३ सप्टेंबर रोजी आपली स्प्लेंडर मोटारसायकल (MH-10-BS-1840) शिरोळ ते धरणगुत्ती रोडवर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरली होती. याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९५/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
दरम्यान, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा टाकून आरोपी मलीकसाब नबीसाब यरनाळ (वय ३४, रा. विजयपूर, कर्नाटक, सध्या मुरसल, ता. शिरोळ) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल व JCB कंपनीचे एक JCB मशीन (मूल्य ११ लाख रुपये) असा एकूण ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एम. गायकवाड, पोसई गिरीश शिंदे, श्रेणी उपनिरीक्षक संजय नाईक, पोहेकॉ बाबाचाँद पटेल, अमित कदम, सुशांत ठोंबरे, रानमाळे, मडिवाळ, बांगर, जाधव, खराडे, ओंबासे, राठोड, खरात, काळेळ, कुंभार, खंडागळे यांच्या पथकाने केली.
या यशस्वी कारवाईबद्दल शिरोळ पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिरोळ पोलिसांची मोठी कामगिरी – चोरीला गेलेली दुचाकी व ११ लाखांचा JCB जप्त
|