बातम्या
शिरोळच्या डॉ. दगडू माने यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
By nisha patil - 11/6/2025 2:52:28 PM
Share This News:
शिरोळच्या डॉ. दगडू माने यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव – राज्यस्तरीय मंचावर शिरोळचा डंका
शिरोळ तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सिनेअभिनेते डॉ. दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा गौरव सोहळा मुंबई येथे भव्य समारंभात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दगडू माने आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता माने (वहिनी) यांचा सन्मान करण्यात आला.या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पुणे विभागाचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राज्यमंत्री भारत गोगावले, राज्यमंत्री राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा ठरला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने केलेला सन्मान गाव, तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
शिरोळच्या डॉ. दगडू माने यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
|