राजकीय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा जाहीरनामा जाहीर
By nisha patil - 8/1/2026 3:06:52 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला. ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर शहरासाठी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व जनहितदक्ष प्रशासन देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहर विकास, पायाभूत सुविधा व नागरिक सुविधा प्राधान्यक्रमात
जाहीरनाम्यात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ड्रेनेज व पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, पूरनियंत्रण, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्था, सक्षम केएमटी बससेवा, २४ तास पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व युवकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या.
महिला, दुर्बल घटक व पर्यावरण
संरक्षणावर विशेष भर
महिलांसाठी सुरक्षित शहर अभियान, बचतगटांना आर्थिक पाठबळ, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, झोपडपट्टी पुनर्वसन, अंबाबाई अन्नछत्र, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती, वृक्षारोपण व हरित शहर निर्मितीचे आश्वासन देण्यात आले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती, मतदारांना आवाहन
या वेळी रविकिरण इंगवले, विजय देवरे, सुनील मोदी तसेच शिक्षक संघटनेचे आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते. मशाल व हात या चिन्हावर मतदान करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा जाहीरनामा जाहीर
|