बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे आक्रमक; गडहिंग्लज व कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Shiv Sena District Chief Prof aSunil Shintre


By nisha patil - 9/28/2026 11:12:21 PM
Share This News:



शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे आक्रमक; गडहिंग्लज व कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
 

कागल प्रतिनिधी : अजित बोडके कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर : राज्य शासनाने महाराष्ट्रातील १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ चंदगड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, गडहिंग्लज व कागल तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक भीषण पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा समावेश तातडीने दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील अर्जुन शिंत्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. २८/०९/२०२६ रोजी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, कागल भागात समाधानकारक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात गडहिंग्लज व कागल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी, बोअरवेल आटल्या असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. खरीप पिके करपून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शासनाने चंदगड तालुक्यात दुष्काळ जाहीर करताना शेजारील गडहिंग्लज व कागल तालुक्याला वगळणे हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळाच्या सवलती, पीकविमा, कर्जमाफी, चारा छावण्या, पाणीपुरवठा योजना यांचा लाभ या तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणे आवश्यक आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

निवेदनावर स्वाक्षरी असलेले प्रमुख पदाधिकारी :
* श्री. संजय पवार – उपनेते • प्रा. सुनील शिंत्रे – जिल्हाप्रमुख, कोल्हापूर • श्री. संभाजी पाटील – उपजिल्हाप्रमुख • श्री. संभाजी मोरे – उपजिल्हाप्रमुख • श्री. जयसिंग टिकले – कागल तालुकाप्रमुख 
यासोबतच गडहिंग्लज, कागल व परिसरातील तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

 


शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे आक्रमक; गडहिंग्लज व कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Total Views: 33