राजकीय
ताराबाई पार्क येथे शिवसेनेच्या नव्या शहर शाखेचा शुभारंभ; 52 वॉर्डांत शाखा विस्ताराचा संकल्प
By nisha patil - 1/6/2026 10:34:48 AM
Share This News:
शिवसेनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील डी-मार्ट परिसरात नव्या शहर शाखेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन शहरप्रमुख मंजित माने यांनी केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण दुधवडकर यांनी कोल्हापूर शहरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून पक्षविस्तारासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्व शिवसैनिकांनी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडण्याची गरज असल्याचे सांगितले.
शहरप्रमुख मंजित माने यांनी पुढील सहा महिन्यांत कोल्हापूर शहरातील सर्व 52 वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला. या शाखांमार्फत नागरिकांच्या विविध समस्या सोडविणे, लोकसेवेची कामे राबविणे आणि शिवसैनिकांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळुंखे, स्मिता सावंत, रीमा देशपांडे, पप्पू नाईक, शुभम पाटील, राहुल माळी, दीपक गौड, शुभांगी साळोखे, हर्षल पाटील, दीपा शिंदे, महादेव कुकडे, शाखाप्रमुख अक्षय माळगे तसेच राहुल जाधव, योगेश देसाई, आदित्य हुलजी, चिन्मय बोकील, अक्षय घाटगे, लतीफ शेख, अमृता जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली. आभार प्रदर्शन अभिषेक दाबाडे यांनी केले.
पक्षविस्तारासाठी संघटन मजबूत करा; अरुण दुधवडकरांचे आवाहन
|