बातम्या

शिवसेना (उबाठा) तर्फे विशाल नवार व लहू वाकर यांचा सत्कार

Shiv Sena Ubatha felicitates Vishal Nawar and Lahu Walker


By nisha patil - 9/21/2025 9:46:46 PM
Share This News:



शिवसेना (उबाठा) तर्फे विशाल नवार व लहू वाकर यांचा सत्कार

अंधत्वावर मात करून आयबीपीएस परीक्षेत यश, सामाजिक कार्यासाठी पुढारी पुरस्कार

आजरा (हसन तकीलदार) जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे गवसे येथील विशाल नवार व लिंगवाडीचे सरपंच लहू वाकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

गवसे येथील विशाल शिवाजी सुतार (नवार) यांनी अंधत्वावर मात करत आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण केली असून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क पदावर नियुक्ती मिळवली आहे. बेताची परिस्थिती आणि डोळ्यांची व्याधी असूनही घरच्यांच्या पाठबळाने व स्वतःच्या चिकाटीच्या जोरावर त्यांनी मुंबईत शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.

तर लिंगवाडी (ता. आजरा) येथील सरपंच परिषद मुंबईचे सदस्य आणि लिंगवाडी–किटवडेचे सरपंच लहू वाकर यांना सामाजिक कार्याबद्दल दै. पुढारी पुरस्काराने गौरविण्यात आले. वणवा निर्मूलन, वृक्ष लागवड आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या दोघांच्या यशाचा गौरव करत शिवसेना (उबाठा) तर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात तालुकाप्रमुख युवराज पवार, उपतालुका प्रमुख शिवाजी आढाव, शाखा प्रमुख श्रावण वाकर, तसेच बिलाल लतीफ, विजय डोंगरे, अमित गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.


शिवसेना (उबाठा) तर्फे विशाल नवार व लहू वाकर यांचा सत्कार
Total Views: 112