बातम्या
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण नूतन शिवसेना पदाधिकारी सत्कार सोहळा
By nisha patil - 11/19/2026 8:32:44 PM
Share This News:
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण नूतन शिवसेना पदाधिकारी सत्कार सोहळा
*आजरा(हसन तकीलदार):- शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्य संघटक नवेज मुल्ला व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन सह संपर्कप्रमुख संभाजी पाटील,जिल्हा संघटक संभाजी भोकरे,चंदगड विधानसभा उपजिल्हाप्रमुख युवराज पवार,कागल विधानसभा उपजिल्हाप्रमुख जयसिंग टिकले, राधानगरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख रवी पाटील तसेच नूतन कागल तालुकाप्रमुख अजित मोडेकर, राधानगरी तालुका प्रमुख अशोक पाटील,उत्तम शेटके,विक्रम पाटील,गडहिंग्लज तालुकाप्रमुख भरत जाधव, भुदरगड तालुकाप्रमुख विक्रम आरडे,आजरा तालुका प्रमुख संजय येसादे,चंदगड तालुकाप्रमुख महेश पाटील,चंदगड उपजिल्हा संघटक डॉक्टर संजय पाटील, चंदगड तालुका संघटक महादेव गावडे,भुदरगड तालुका समन्वयक सुरेश पाटील,कागल उपजिल्हा संघटक दिलीप पाटील, उप जिल्हा समन्वयक महाळू करीकट्टी यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी उपनेते संजय पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर निष्ठा ठेवून काम करावे पक्षात शिस्त असली पाहिजे.शिस्त हीच शिवसेनेची ओळख आहे असे मार्गदर्शन केले.राज्य संघटक नवेज मुल्ला यांनी नूतन पदाधिकारी यांनी जोमाने काम करावे व शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून द्यावे असे आवाहन केले.शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे यांनी आपण जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देऊन नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देऊन जुनी आणि नवे असा मेळ घालून ताकदीने काम करावे त्यामुळे शिवसेनेला नव संजीवनी मिळेल त्याचबरोबर उद्धव ठाकरेसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवून गद्दारी करणारा शिंदे गट व भाजप यांना धडा शिकवू या असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवराज पवार यांनी केले.सूत्रसंचालन शहर प्रमुख समीर चांद तर आभार तालुका प्रमुख संजय येसादे यांनी केले यावेळी आजरा पंचायत समिती सभापती यशोदा पोवार, सेना जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील,आजरा तालुक्यातील दिनेश कांबळे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील,उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव,शहर प्रमुख सागर नाईक,महादेव सुतार, महिला संघटिका मीना पुजारी,शितल कांबळे,राजश्री होण्याळकर यासह तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण नूतन शिवसेना पदाधिकारी सत्कार सोहळा
|