बातम्या

आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोडेमारो आंदोलन

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group


By nisha patil - 11/19/2026 10:38:22 PM
Share This News:



आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोडेमारो आंदोलन

*आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यात शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राशी संबंधित वादावरून हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
     

आजऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या वादावरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलनाच्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांचा फोटो फाडून त्यावर जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणांनी तेथील सर्व परिसर दणाणुन सोडला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आक्रमक भूमिका घेत जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला.
शिंदे गटाच्या नेत्या शायना यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर फाडले या निषेधार्थ शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने शिवतीर्थासमोर शायना यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार,राज्य संघटक नवेज मुल्ला जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे,सहसंपर्कप्रमुख संभाजी पाटील,उपजिल्हाप्रमुख युवराज पवार,जिल्हा संघटक संभाजी भोकरे,आजरा तालुका प्रमुख संजय येसादे,त्याचबरोबर कागल उपजिल्हाप्रमुख जयसिंग टिकले,राधानगरी उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, दिनेश कांबळे,महेश पाटील, आरोग्य तालुकाप्रमुख दयानंद भोपळे,शहर प्रमुख समीर चांद,शिवाजी आढाव,महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका विमल पाटील,अनुसया पाटील,गीता पुजारी,सभापती यशोदा पवार तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोडेमारो आंदोलन
Total Views: 44