ताज्या बातम्या

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शक्तिप्रदर्शन; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray partys show of strength


By Administrator - 1/15/2026 1:23:19 PM
Share This News:



शेंडूर प्रतिनिधी : अजित बोडके

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संघटनात्मक तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता नरतवडे (ता. राधानगरी) येथील शिवसेना विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती, कार्यकर्त्यांची बांधणी, तसेच पक्षाचा विचार तळागाळात पोहोचविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, संभाजीराव भोकरे, महिला जिल्हाप्रमुख विमल पाटील, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, अविनाश शिंदे, बाबासाहेब पाटील, उत्तम पाटील, डाकरे, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोक पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख कागल नवनाथ पाटील, विधानसभा संघटक सागर के., शंकराव गुरव, तसेच उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शक्तिप्रदर्शन; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक
Total Views: 47