बातम्या
भूमी अभिलेख कार्यालयाला शिवसेनेने विचारला जाब
By Administrator - 2/27/2026 2:27:26 PM
Share This News:
भूमी अभिलेख कार्यालयाला शिवसेनेने विचारला जाब
भुदरगड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात आज शिवसेना कार्यकर्त्यांनी अचानक भेट दिली गेले काही दिवसापासून शासनाने गावठाण नोंदणी व सर्वे करण्याचा प्रारंभ केला होता भुदरगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एका नावाच्या मालकांचे प्रॉपर्टीत दुसऱ्या मालकांची नावे नोंद केलेली आहेत त्यामुळे गावागावात भावकी भावकीत वाद उत्पन्न व्हायला सुरू झाला आहे ही खरी चूक संबंधित सर्वे करणारे अधिकाऱ्यांचे आहे आणि याचा नाहक त्रास सर्वसामान्य शेतकऱ्याला होतो आहे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांना तातडीने नोटीस बजावण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली
यावेळी भूमिलेखचे अधिकारी कुलकर्णी यांनी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितलं त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे यांनी तुम्ही यापूर्वी काय केलं लोकांच्या त्रासाला जबाबदार कोण पुन्हा लोकांनी आपल्या कार्यालयात चूक दुरुस्तीची मागणी केल्यास हेलपाट न मारता त्यांचं काम पूर्ण करावे अशी मागणी केली यावी युवासेना तालुकाप्रमुख महेश पाटील विभाग प्रमुख सुनील म्हसकर विभाग प्रमुख दत्ता हेवाळे थॉमस डिसोजा शिवाजी गायकवाड कृष्णात डाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते या बातमी निमित्त आवाहन करताना सर्व शेतकरी बांधवांनी भूमी अभिलेख बाबतीत काही अडचणी असल्यास चुकीच्या नोंदी घातल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आव्हान प्रकाश पाटील यांनी यावेळी केले
भूमी अभिलेख कार्यालयाला शिवसेनेने विचारला जाब
|