बातम्या
शिवसेनेतर्फे मर्दानी खेळ शिबिराचा यशस्वी समारोप
By nisha patil - 5/17/2025 3:44:13 PM
Share This News:
शिवसेनेतर्फे मर्दानी खेळ शिबिराचा यशस्वी समारोप
अथर्व कारंडे व अद्विका नलावडे ठरले शिबिरातील उजवे खेळाडू
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिद्धाळा गार्डन येथे ५ मे ते १५ मे दरम्यान आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ) प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोप काल उत्साहात पार पडला. शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर प्रमुख दिनेश साळोखे व नितीश तांबेकर यांच्या नियोजनाखाली हे शिबीर यशस्वी झाले.
शिबिरात देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, तलवार, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग यांसारख्या पारंपरिक व कौशल्यपूर्ण खेळांचे प्रशिक्षण घेतले. अथर्व कारंडे (शिर्डी) आणि अद्विका नलावडे (पुणे) हे उत्कृष्ठ शिबिरार्थी ठरले. शिबिराच्या सांगता समारंभाला शिवसेनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे मर्दानी खेळ शिबिराचा यशस्वी समारोप
|