बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख इंगवले यांचा आम.क्षीरसागरांवर घणाघात

Shiv Sena district chief Ingavale attacks


By nisha patil - 8/20/2025 5:19:18 PM
Share This News:



शिवसेना जिल्हाप्रमुख इंगवले यांचा आम.क्षीरसागरांवर घणाघात

खाजगी गाडीवर 'पोलीस' स्टिकर; क्षीरसागरांवर गुन्हा दाखल करण्याची इंगवले यांची मागणी

खाजगी वाहनावर "पोलीस" स्टिकर लावून वावरण्याचा प्रकार समोर आल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागरांवर घणाघात करत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सदर वाहन – काळी स्कॉर्पिओ (MH09 FV 3784) – हे क्षीरसागर यांच्या ताफ्यातील असून त्यावर शासकीय पोलीस फलक लावण्यात आला आहे. हा मोटार वाहन कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचा ठपका इंगवले यांनी ठेवला. त्यांच्या मते, अशा प्रकारातून तस्करी, खंडणी, पैशांची देवाणघेवाण यांसारख्या गुन्हेगारी कारवायांना खतपाणी मिळू शकते.

इंगवले यांनी उघड प्रश्न विचारला की, “दिवसाढवळ्या या गाडीला पोलीस फलक लावून शहरात फिरण्याची परवानगी कोणी दिली? ही पोलीस दलाची अक्षम्य डोळेझाक नाही का?”

त्यांनी केवळ फलकाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली नाही, तर या वाहनाचा वापर गेल्या अनेक वर्षांत कुठे-कुठे झाला याची CID चौकशी व्हावी, अशी मागणी केली. पुढे क्षीरसागरांवर गंभीर आरोप करत इंगवले म्हणाले – “बिल्डर, डॉक्टर, कंत्राटदारांना धमकावून पैसे उकळणे, मेडिकल बिलात लूट करणे, संपत्ती जमवणे — ही पांढरी लूट सुरू आहे आणि पोलिस दल त्याकडे मूकपणे पाहत आहे.”

कोल्हापूरात न्यायालयीन सर्किट बेंच सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, इंगवले यांनी सुचवले की क्षीरसागरांविरोधात दाखल होणारा पहिलाच खटला हा असावा. शिवसेनेने शासनाला इशारा दिला आहे की, “लूटमार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचे धाडस करू नये, अन्यथा जनता आणि शिवसेना दोन्हींकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”


शिवसेना जिल्हाप्रमुख इंगवले यांचा आम.क्षीरसागरांवर घणाघात
Total Views: 101