बातम्या
गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार
By Administrator - 7/28/2025 12:48:23 PM
Share This News:
गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार
कायाकल्प पुरस्काराच्या यशामागे संघटनात्मक कार्याची चमक – विक्रम चौगुले
गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सलग सात वेळा 'कायाकल्प' संस्थेच्या उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मान मिळवणाऱ्या या रुग्णालयाच्या यशस्वी कार्यप्रणालीची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. महेंद्र फाळके, डॉ. महेश पाटील, डॉ. बचारे मॅडम, डॉ. दिपाली मॅडम, तसेच बन्सोडे सिस्टर व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता. डॉ. दिलीप वाडकर यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपजिल्हा प्रमुख विक्रम चौगुले (बापू) यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात वीरेंद्र भोपळे, ग्राहक सेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, युवा सेनेचे सचिन नागटिळक, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमातून जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार
|