राजकीय
शिवसेनेचा उद्या गटप्रमुख मेळावा; उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन : आमदार श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती
By nisha patil - 4/11/2025 12:57:56 PM
Share This News:
कोल्हापूर दि.०४ : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल सकारात्मक वातावरण आहे.
उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना, महायुतीच्या माध्यमातून घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे.
आगामी निवडणुकात कार्यकर्त्यांच्या कामाला न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, त्यादृष्टीने शिवसेनेच्या वतीने राज्यभर गटप्रमुख मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. उद्या दि.०५ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, शिवसेनेच्यावतीने गटप्रमुख मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, शिवसेनेच्यावतीने दुपारी १.०० वाजता रामकृष्ण लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या नियोजनाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर व माजी खासदार संजय मंडलिक यांनी सकाळी केली. या मेळाव्यास शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचा उद्या गटप्रमुख मेळावा; उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन : आमदार श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती
|