बातम्या
आजरा आगाराच्या ढिसाळ कारभाराविरोधत शिवसेना उबाठा आक्रमक..
By nisha patil - 9/25/2025 12:39:40 PM
Share This News:
आजरा आगाराच्या ढिसाळ कारभाराविरोधत शिवसेना उबाठा आक्रमक..
आगार प्रमुखांच्या नियोजन शून्य करभाराचा आगाराला बसतोय फटका..
आजरा(हसन तकीलदार) आजरा तालुक्यातील एसटीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशी, विद्यार्थी व रुग्णांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी आजरा आगार प्रमुख प्रविण पाटील यांना धारेवर धरले.
कोरोनानंतर बंद झालेल्या एसटीच्या फेऱ्या तातडीने सुरू करून, वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीदरम्यान पालक व विद्यार्थ्यांनी आपापल्या अडचणींची मांडणी केली. आगार प्रमुख प्रविण पाटील यांनी पंधरा दिवसांत वेळापत्रक सुरळीत करण्याची ग्वाही दिली. प्रा. शिंत्रे यांनी स्पष्ट केले की, “बसस्थानकावर जाऊन अधिकारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहावीत.
चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार होईल, पण गैरसोयी सहन केल्या जाणार नाहीत.” तर युवराज पोवार यांनी एसटीचे वेळापत्रक तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. या बैठकीस शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, नारायण कांबळे, महेश पाटील, ओमकार गिरी, भिकाजी विभुते, शिवाजी इंगळे, प्रसाद जोशी, संदीप खवरे, राजाराम येसादे यांच्यासह शिवसैनिक व अधिकारी उपस्थित होते
आजरा आगाराच्या ढिसाळ कारभाराविरोधत शिवसेना उबाठा आक्रमक..
|