बातम्या
आवाजवी वीजबिलाविरुद्ध शिवसेना उबाठा आक्रमक गरीब जनतेला लुटायचं काम बंद करा-उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील
By Administrator - 1/30/2026 6:02:46 PM
Share This News:
आवाजवी वीजबिलाविरुद्ध शिवसेना उबाठा आक्रमक गरीब जनतेला लुटायचं काम बंद करा-उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्यातील अमराई गल्ली येथील वंजारे यांचे विजबिल वाढून आल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आणि तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी शिवसैनिकांसह महावितरण कार्यालयाला धडक जाऊन याबाबत जाब विचारला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील म्हणाले की, गोरगरिबांना लुटू नका. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका. आमचा आजरा तालुका डोंगराळ भागात गणला जातोय. इथली लोकं हाताच्या पोटावरची आहेत, गरीब आहेत. त्यांना लुटायचा काम करू नका.
तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले की, ज्या ज्या वीज बिलवाढीच्या तक्रारी आहेत त्यांचा ग्राहक मेळावा घ्या आणि ज्यांची ज्यांची बिले वाढून आलेली आहेत त्यांची बिले कमी करून द्या. वाढीव आलेलं बिल ग्राहक दाखवायला आला की कर्मचारी सांगतात की आधी हे बिल भरा नंतर कमी करूया. ही गरीब माणसे पाच हजार आणि सहा हजारची वीज बिले कशी भरणार? या महागाईत पोट भरायचं मुश्किल झालंय ते हजारात बिलं कशी भरणार? त्यामुळे ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्या. जर यात बदल नाही झाला तर आम्ही पुढे जाऊन आंदोलन करणार असा इशारा दिला.
यावेळी समीर चांद (शहर प्रमुख ), शिवाजी इंगळे, सुयश पाटील, अमित गुरव, चंद्रकांत पाटील, बिलाल लतीफ, महादेव गुरव, हरिश्चंद्र व्हराकटे, इम्तियाज माणगावकर, सागर नाईक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, सदर वीज मीटर हे सप्टेंबर महिन्यात बदलले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये वीजबिल नियमित आलेलं आहे डिसेंबर महिन्यात बिल वाढून आलेलं आहे. पुन्हा जानेवारीच्या महिन्यात 21दिवसात फक्त 6युनिट वीज वापर झालेला आहे. मीटर तपासले असता मीटरही फॉल्टी नाही.
सदर महिन्यात त्यांनी जादा वीज वापर केल्यानेच जादा विजबिल आलेले आहे. तरीसुद्धा स्लॅब बेनिफिटमध्ये बसवून त्यांना वीजबिल कमी करून दिलेले आहे. असे यावेळी दयानंद आष्टेकर (उपकार्यकारी अभियंता), संभाजी रवंदे(बिलिंग वरिष्ठ तंत्रज्ञ), इम्रान अत्तरवाले(बिलिंग अधिकारी) यांनी सांगितले.
आवाजवी वीजबिलाविरुद्ध शिवसेना उबाठा आक्रमक गरीब जनतेला लुटायचं काम बंद करा-उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील
|