राजकीय

 महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज; मुलाखतींची प्रक्रिया जाहीर

Shiv Sena ready for municipal elections


By Administrator - 12/16/2025 4:58:29 PM
Share This News:



 महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज; मुलाखतींची प्रक्रिया जाहीर

आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दि. २० डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर (खानविलकर पेट्रोल पंप शेजारी), कोल्हापूर येथे पार पडणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

महायुती एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. या मुलाखतीसाठी आवश्यक नोंदणी अर्ज दि. १६ डिसेंबरपासून वितरीत केले जाणार असून, दि. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. मुलाखतीनंतरचा अहवाल मध्यवर्ती पक्ष कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.


 


 महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज; मुलाखतींची प्रक्रिया जाहीर
Total Views: 47