बातम्या
बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा आजऱ्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध; साईना यांच्या फोटोचे दहन
By nisha patil - 11/19/2026 8:31:12 PM
Share This News:
बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा आजऱ्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध; साईना यांच्या फोटोचे दहन
कोल्हापूर प्रतिनिधी : अजित बोडके कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आजरा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख संभाजीराव पाटील, जिल्हा संघटक संभाजीराव भोकरे तसेच महाराष्ट्राचे शिवसेना समन्वयक नवेज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. यावेळी संबंधित साईना यांच्या फोटोचे दहन करून शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, "आमचे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान स्वाभिमानी शिवसैनिक आणि पदाधिकारी कधीही खपवून घेणार नाहीत."
जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनीही तीव्र भावना व्यक्त करत, "यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अशा प्रकारची भूमिका घेतली, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असा इशारा दिला.
या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख युवराज पवार, जयसिंग टिकले, रवी पाटील, तालुकाप्रमुख मनोज शेटके, वाहतूक सेना पदाधिकारी नितीन डावरे, दिलीप पाटील, अजित मोडेकर, सावंता कांबळे, चंदर पाटील, अमर संकपाळ, रवी लोकरे, अशोक पाटील, विक्रम आरडे, आजऱ्याचे यशादी चंदगडचे महादेव पाटील, डॉ. संजय पाटील आदींसह विविध भागांतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा व्यक्त करत शिवसैनिकांनी या आंदोलनातून पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.a
बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा आजऱ्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध; साईना यांच्या फोटोचे दहन
|