विशेष बातम्या
उंचगाव माळीवाडा पूल विस्तारीकरणाची शिवसेनेची जोरदार मागणी
By nisha patil - 9/6/2025 3:28:39 PM
Share This News:
उंचगाव माळीवाडा पूल विस्तारीकरणाची शिवसेनेची जोरदार मागणी
लांबी, रुंदी, उंची न वाढविल्यास आंदोलनाचा इशारा
उंचगाव (ता. करवीर) येथे माळीवाडा पूल अत्यंत अरुंद असून वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व ग्रामस्थांनी पूलाची लांबी, रुंदी व उंची वाढविण्याची मागणी करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मनेजर सी.बी. भरडे यांना निवेदन दिले.
यापूर्वी रेल्वेलाईनपर्यंत पिलर प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, उचगांवकरांना दिलेल्या आश्वासनानुसार पिलर माळीवाडा पुलापर्यंत वाढवावेत, अशी मागणी पुन्हा झाली. अधिकारी सी.बी. भरडे यांनी यासंदर्भात लांबी 12.5 मीटर व उंची 4.5 मीटर इतका पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्याचे सांगितले. तसेच दोन्ही बाजूंना बोगदे होणार असल्याने वाहतूक सुरळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूल न वाढवल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेनेने दिला.
यावेळी राजू यादव, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, योगेश लोहार, दीपक रेडेकर, शरद माळी, सुनील पारपाणी, रामराव पाटील, धनाजी पाटील, आनंदा मेंगाने, गणेश माळी, अनिल माळी, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, शशिकांत पाटील आदी. उपस्थित होते.
उंचगाव माळीवाडा पूल विस्तारीकरणाची शिवसेनेची जोरदार मागणी
|