राजकीय
पन्हाळा महायुतीतल्या मित्र पक्षाला धक्का ! शिवसेना-राष्ट्रवादी'चा पंचायत समितीत सत्ता स्थापन करणार
By nisha patil - 2/13/2026 11:56:10 AM
Share This News:
पन्हाळा महायुतीतल्या मित्र पक्षाला धक्का ! शिवसेना-राष्ट्रवादी'चा पंचायत समितीत सत्ता स्थापन करणार
पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर) :- गेले 25 वर्ष अपवादात्मक वगळता एक हाती सत्ता जनसुराज्य पक्षाची पन्हाळा पंचायत समितीमध्ये राहिली आहे. यावेळी चंद्रदीप नरके यांच्या शिवसेनेने चार जागा निवडून आल्या आहेत. तसेच बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या राष्ट्रवादी पक्षाने तीन सदस्य हे निवडून आले आहेत. या दोघांची बेरीज सात होते. चार सदस्य हे जनसुराज्य चे निवडून आले आहेत.तर एक अपक्ष असे मिळून एकूण 12 सदस्य आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत पन्हाळा पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करणार व जनसुराज्य ला सत्ये पासून रोखणार असे पत्रकार परिषद मध्ये करवीर चे आमदार चंद्रदीप नरके व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन तालुक्यातील नागरिकांना सत्ते स्थापनेबद्दल पन्हाळा येथे माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष पाटील-आसुर्लेकर बोलताना सांगितले की ,आमची पूर्वीपासून युती आहे. ज्यावेळी आम्ही नरके-पाटील गट म्हणून तालुक्यात एकत्र लढत होतो. त्यावेळी सुद्धा आम्ही एकत्रच होतो. आत्तासुद्धा आहे.भविष्यात पण एकत्र राहणार असे त्यांनी सांगितले.तसेच आमच्यात मोठा भाऊ म्हणून नरके साहेब निर्णय घेतील व अडीच अडीच वर्षाचा सभापती,उपसभापती कार्यक्रम राहील. सध्या तरी आम्ही काय ठरवलं नाही. सर्व निर्णय हे नरके साहेब घेतील. जनाधाराचा सन्मान करत पंचायत समितीत सत्तास्थापन करणार आहे.अशी त्यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.

तसेच यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले की, सोशल मीडियावर चुकीचे मेसेज फिरत होते. त्यामुळे आम्ही तात्काळ पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना लोकांना याची माहिती दिली. काही गैरसमज पसरू नये. तात्काळ नागरिकांना याची माहिती व्हावी. म्हणून ही पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच लोकांकडून आम्हाला जो कौल दिला आहे. आम्ही जनतेचा सन्मान ठेवत सत्ता स्थापन करणार आहे. पन्हाळा पंचायत समिती मध्ये सभापती व उपसभापती पदासाठी समारे जात आहे. यावेळी त्यांनी चांगल्या कामासाठी सगळ्यांनी मदत करावी. विरोधकांनी फोडाफोडीचे राजकारण करु नये. असे आव्हान आमदार नरके यांनी केले. तसेच महायुतीची मीटिंग झाली होती. त्यावेळी जनसुराज्य चे संस्थापक यानी त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही वैयक्तिक लढणार, माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणार तो आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांच्यावर युती करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच तुम्हाला माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर आबा) मदत केली का? पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर आमदार नरके यांनी देताना सांगितले की, हो केली आहे. जसे राहुल पाटील नी आमच्या विरोधक काम केले.तसेच त्यांनी उघड उघड आम्हाला मदत केली आहे. जर आम्हाला कोण मदत करत असेल तर आम्ही मदत घेऊ नये का? त्यांची आम्हाला या तालुक्यात मदत होती. असे त्यांनी जाहीर पणे सांगितले.
यावेळी निवडून आलेल्या नवनिर्वाचित पन्हाळा तालुक्यातील जिल्हापरिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातले सर्व माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. तसेच यावेळी माजी सभापती संजय चावरेकर,अजित नरके, रवींद्र चौगुले दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
पन्हाळा महायुतीतल्या मित्र पक्षाला धक्का ! शिवसेना-राष्ट्रवादी'चा पंचायत समितीत सत्ता स्थापन करणार
|