राजकीय
कोल्हापुरात पुन्हा शिवसेना बळकट करणार - महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे
By nisha patil - 11/17/2025 4:58:41 PM
Share This News:
कोल्हापुरात पुन्हा शिवसेना बळकट करणार - महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे
कोल्हापूर - प्रतिनिधी - कोल्हापुरात पुन्हा शिवसेना बळकट करून महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देऊ, असे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना राजारामपुरी शाखा आणि महिला आघाडी यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. राजारामपुरीत झालेल्या या कार्यक्रमात प्रतिज्ञा उत्तुरे बोलत होत्या. उद्योजक महेश उत्तुरे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे या घोषणा देऊन स्फूर्ती दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे नूतन उपशहर प्रमुख शुभम जाधव, विभाग प्रमुख सुरज कांबळे, विभाग प्रमुख युगंधर कांबळे यांची सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहर प्रमुख विमा देशपांडे, विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, उपशहर प्रमुख रघुनाथ टिपुगडे, युवा सेना महानगरप्रमुख सनी शिंदे, उपशहर संघटिका अमृता सावेकर, दत्ता गायकवाड, आसिफ मुल्लानी, सुशील संकपाळ, उत्तम कांबळे, किरण कांबळे, विशाल जाधव, उमेश उत्तुरे, संदीप देवकुळे, विशाल देशपांडे, आर्यन मंगुडकर, पृथ्वीराज बिरांजे, राहुल कोथमीरे, दुर्गेश नलवडे यांच्या सह भागातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, नागरिक महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापुरात पुन्हा शिवसेना बळकट करणार - महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे
|