राजकीय
हातकणंगले नगरपंचायतीत शिवसेनेचा विजय; अजितसिंह पाटील नगराध्यक्ष
By nisha patil - 12/21/2025 12:20:16 PM
Share This News:
हातकणंगले :- हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अजितसिंह पाटील यांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे हातकणंगले नगरपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगरसेवक पदाच्या निकालात शिंदे गटाला ६ जागा, काँग्रेसला ५ जागा, शिवसेना ठाकरे गटाला १ जागा, भाजपला २ जागा, तर ३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे नगरपंचायतीत मिश्र सत्तासमीकरण पाहायला मिळत आहे.
निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला. विजयी उमेदवार अजितसिंह पाटील यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी अभिनंदन केले.
नव्या सत्तेमुळे हातकणंगले नगरपंचायतीत आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हातकणंगले नगरपंचायतीत शिवसेनेचा विजय; अजितसिंह पाटील नगराध्यक्ष
|