बातम्या

शिवसेनेचा ‘मिशन महानगरपालिका’ मेळावा उत्साहात संपन्न - आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

Shiv Senas Mission Municipal Corporation


By nisha patil - 12/19/2025 5:01:39 PM
Share This News:



शिवसेनेचा ‘मिशन महानगरपालिका’ मेळावा उत्साहात संपन्न - आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर, दि. १९ : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘मिशन महानगरपालिका’ इच्छुक उमेदवार व पदाधिकारी मेळावा आज शुक्रवारी अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला इच्छुक उमेदवार, शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, आगामी महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असून महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संपूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील विविध प्रभागांमध्ये शिवसेनेकडे सक्षम व इच्छुक उमेदवारांची मोठी फळी असून निवडणुकीसाठी प्रभावी नियोजन, जनसंपर्क वाढवणे, मतदारांपर्यंत सरकारच्या योजना व विकासकामे पोहोचवणे यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सक्षम प्रचार यंत्रणा उभारण्याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संघटन बळकटी, प्रभागनिहाय तयारी आणि निवडणूक रणनीतीबाबत भूमिका मांडली. ‘मिशन महानगरपालिका’ यशस्वी करण्याचा संकल्प उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.

 


शिवसेनेचा ‘मिशन महानगरपालिका’ मेळावा उत्साहात संपन्न - आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
Total Views: 65